शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ येथील नरसिंह चौक परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. रणजित जयसिंग काळे (वय 31) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 10 जूनच्या दुपारपासून 11 जूनच्या सकाळच्या दरम्यान घडली. रणजित काळे याने आपल्या राहत्या घरातील लाकडी तुळईला वैरणीच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अनिल दरी काळे (वय 61) यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार कदम करीत आहेत.
