Top News

बनावट सोन्याप्रकरणी शाखाधिकाऱ्याला अटक



जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क : 

मनी टू मी फायनान्स कंपनीच्या जयसिंगपूर शाखेचा शाखाधिकारी सूरज दत्ता माने, सागर परशुराम कलगुटगी व गौरीष गजानन वायचळ यांनी बनावट व खोटे सोन्याचे दागिने तारण ठेवून बँकेचे १२ लाख ५७ हजार ७८१ रुपयाचे कर्ज घेऊन फसवणुक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसात (दि.23) मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर शाखाधिकारी सूरज दत्ता माने (रा.जयसिंगपूर) याला जयसिंगपूर पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. माने याला शुक्रवारी जयसिंगपूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

थोडे नवीन जरा जुने