Top News

संदीप कारंडेंसह अनेकांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश

हातकणंगले । शिवार न्यूज नेटवर्क :

हातकणंगले येथे भारतीय जनता पक्षाचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील अनेक कार्यकर्ते,माजी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.माजी सरपंच संदीप कारंडे यांच्या पक्षप्रवेशामुळे मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.माजी आमदार सुरेश हळवणकर, आमदार राहुल आवाडे,आमदार अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर,हिंदुराव शेळके,वैभव हिरवे, बाबासाहेब चौगुले,रावसाहेब चौगुले,मंडलाध्यक्ष शितल हावळे आणि शहराध्यक्ष अमर इंगवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यावेळी माजी सरपंच संदीप कारंडे, माजी सरपंच नुरमहमद मुजावर,विद्यमान नगरसेविका सुजाता कारंडे,सामाजिक कार्यकर्ते अनिल कदम, सेवा सोसायटीचे संचालक दादा अपराध, नरसिंह दूध डेअरीचे चेअरमन सुरेश बागे, माजी सरपंच रावसाहेब कारंडे, जयश्री अपराज, माजी नगरसेविका फरीदा मुजावर, माजी सरपंच अनुराधा कदम, रंजना पोद्दार, सुरेश खानावळे, सिकंदर बोरगावे, अलका आरगे, रामदास पवार आणि दीपक चव्हाण यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नवप्रवेशितांचे पक्षाचे उपरणे, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी नवप्रवेशितांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत विकासाभिमुख राजकारणासाठी आणि जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले.मेळाव्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजना, विकासकामे आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.

यावेळी हातकणंगले शहराध्यक्ष अमर इंगवले यांनी नगरपंचायतीच्या राजकारणात महायुती म्हणून एकत्रित लढलो असलो, तरी अपेक्षित मान-सन्मान मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली. या विधानाची उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली.मेळाव्यास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा मेळावा भाजपसाठी संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

थोडे नवीन जरा जुने