जयसिंगपूर / प्रतिनिधी :
शिरोळ तालुक्यातील टाकळी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) उभारणीसाठी ४७.६३ हेक्टर जमीन मंजूर झाल्यानंतर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुंबई येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
शिरोळ तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी स्वतंत्र एमआयडीसी उभारण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग विभाग तसेच संबंधित शासकीय यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळत राज्य मंत्रिमंडळाने टाकळी येथे एमआयडीसीसाठी ४७.६३ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. याबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांचा सत्कार केला.
