Top News

विस्माचा राज्यस्तरीय सीएसआर पुरस्कार मिळाल्याबद्दल राहुल घाटगे यांचा शिवाजी हायस्कूलच्या वतीने सत्कार

सुदर्शन पाटील / शिवार न्यूज नेटवर्क : 

 सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनतर्फे (विस्मा) सन २०२५-२६ चा अत्यंत मानाचा राज्यस्तरीय सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. या सुवर्णमयी यशाची दखल घेत श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, सैनिक टाकळी यांच्या वतीने गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीचे एक्झिक्युटीव डायरेक्टर राहुल घाटगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. राहुल घाटगे यांनी सामाजिक बांधिलकी जपत यापूर्वीच सीएसआर (CSR) च्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील दोन खोल्यांसाठी सुमारे दोन लाख रुपये खर्चाचे सिलींग काम करून दिले होते. त्यांच्या या निरंतर सहकार्याची आणि सामाजिक कार्याची दखल विस्मा सारख्या प्रतिष्ठित संस्थेकडून घेतली गेल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक उदय पाटील यांच्या हस्ते राहुल घाटगे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक विनोद पाटील, सयाजी पाटील अभय पाटील उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने