Top News

जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांची मंत्री सतीश जारकीहोळी यांना सदिच्छा भेट


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री सतीश जारकीहोळी यांची चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांनी गोकाक येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले.

यावेळी अण्णासाहेब हवले यांनी मंत्री जारकीहोळी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. भेटीदरम्यान निपाणी तालुक्यातील विविध विकासकामे, बोरगाव शहरातील पायाभूत सुविधांचे प्रश्न, सर्कल रुंदीकरण तसेच काँग्रेस पक्ष संघटन बळकटीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना अण्णासाहेब हवले म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून राज्यातील जनतेचा काँग्रेस पक्षावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. तसेच निपाणी तालुक्याच्या विकासासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

मंत्री सतीश जारकीहोळी यांनीही विविध विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका घेत शासनाच्या माध्यमातून विकासाला नेहमीच प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली. बोरगाव शहरासह संपूर्ण निपाणी तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २०२८ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची बैठक लवकरच निपाणी येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी डॉ. एन. ए. मगदूम, भाऊसाहेब पाटील, सी. एस. पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने