Top News

राजकारण विरहित समाजकार्यातून नाती जोडणारा देव माणूस म्हणजे डॉ.शंकर माळी : परमपूज्य प्राणालिंग महास्वामीजी

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

        घरच्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करत, मातृ पितृ क्षेत्र हरवलेल्या व बंधू स्वर्गीय महादेव माळी यांच्या सहकार्यातून शिक्षण घेऊन आरोग्य सेवेत काम करणाऱ्या सहकार्य डॉ.शंकर माळी यांनी राजकारण विरहित समाजकारण करत आपल्या कर्तुत्वाचा ठसा पंचक्रोशीत उमटवला आहे.त्यामुळेच आज त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी कार्यक्रमास उत्तुंग जनसागर जमला असल्याचे आशीर्वचन परमपूज्य प्राणलिंग महास्वामी यांनी केले. 

       बोरगाव येथे जनता को ऑफ क्रेडिट सोसायटी लि.बोरगाव व माळी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमृत महोत्सव कार्यक्रमात ते आशीर्वचन करताना बोलत होते.व्यासपीठावर परमपूज सिद्धप्रसाद महास्वामी (गुरुदेव आश्रम चिंचोली),परमपूज्य श्रद्धानंद महास्वामीजी(गीता आश्रम सदलगा),परमपूज्य शिवशरनानंद महास्वामी (मल्लिकार्जुन चिखलगुंडी),यांच्यासह युवा नेते उत्तम पाटील,माजी जि.पं.सदस्य अण्णासाहेब हवले,सुनील नांगरे पाटील,हालशुगर संचालक रामगोंडा पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील माळी कुटुंबीयांवर प्रेम करणारे हितचिंतक मान्यवर उपस्थित होते.

         आशीर्वाचनात बोलताना प्राणलिंगेश्वर महाराज म्हणाले की सुगंध देणारी फुले दोन प्रकारची असतात एक काटेरी तर एक विना काटेरी पण लोक विना काटेरी सुगंधाच्या फुलाचा वास घेणे पसंद करतात, असेच व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर शंकर माळी यांनी समाजातील बहुतांश जाती-धर्माच्या लोकांना मदतीचा हात देऊन सहकार्याची भावना दाखवली असे थोर व्यक्तीमत्वाला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी मनोकामना केली. दरम्यान उपस्थित स्वामी महाराजांनी आपले मनोगत व्यक्त करून आशीर्वाचन दिले. 

         यावेळी युवा नेते उत्तम पाटील म्हणाले की डॉक्टर शंकर माळी म्हणजे गावाला शहराला एक सहानुभूतीची लाट देणारे आदर्श व्यक्तिमत्व आहे, गावच्या जडणघडणीत माळी घराण्याचा मोलाचा वाटा असून डॉक्टर शंकर माळी यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. *. यावेळी माजी जि. प सदस अण्णासाहेब हवले यांनीही डॉक्टर शंकर माळी यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना उदंड आयुष्य लाभण्याची शुभेच्छा दिल्या.

       अमृत महोत्सव कार्यक्रमात 75 सुहासिनी महिला मंडळींना हळदीकुंकू व ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.त्याचबरोबर यांच्या वर्ग मित्रांचाही सत्कार करण्यात आला.शिवाय गावातील बैल जोडी पाळणाऱ्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला.तसेच वृद्धाश्रम मध्ये अन्नधान्य वाटप,शालेय विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप तसेच सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून सकाररत्न डॉ.शंकर माळी यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम विविध उपक्रमांनी संपन्न झाला.

      75 व्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात सहकार रत्न डॉ. शंकर माळी यांना जनता को ऑफ क्रेडिट सोसायटी व गौरव समिती यांच्यामार्फत स्मृती व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या सह पंचक्रोशीतील हितचिंतक मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.

         प्रारंभी स्वागत नगरसेवक व गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप माळी यांनी करून प्रास्ताविक संस्थेचे व्यवस्थापक धनंजय काकडे यांनी केले. 

     याप्रसंगी युवा नेते उत्तम पाटील,माजी जि प सदस्य अण्णासाहेब हवले,सुनील नांगरे पाटील,हालशुगर संचालक रामगोंडा पाटील, मल्लू हंडे,अभय मगदूम,दिगंबर कांबळे,राजू मगदूम, अशोक माळी,संदीप माळी, बंडू माळी,यांच्यासह पंचक्रोशीतील हितचिंतक मान्यवर आप्तेष्ट मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने