Top News

रुकडी येथील पत्रकार रविकिरण बळे यांना 'शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार'

 


संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :

 दैनिक रोखठोक व्हिजनच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात रुकडी येथील रविकिरण सुदाम बळे (खजिनदार रुकडी ग्रामिण पत्रकार संघ ) यांना शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६ गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांतजी कवळेकर यांच्या शुभ हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. 

दै .रोखठोक व्हिजनचे संपादक सुरेश माडकर यांनी कोल्हापूर येथे चार वर्षापूर्वी सुरू केलेल्या या वृत्तपत्राने अल्पावधीतच महाराष्ट्राच्या काणाकोप-यातील बातम्या व जाहिरातींच्या माध्यम तून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखानीय कार्य करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातून एका निवडक व्यक्तींला या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले

रुकडी ता हातकणंगले प्रतिनिधी रविकिरण बळे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समाजहिताची जाणीव ठेवून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोखठोक परिवाराच्या वतीने त्यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य पंकजजी भिवटे, शिवराज नायकवडे, रोखठोकचे कार्यकारी संपादक सुरेश राठोड, उपसंपादक गुंडोपंत सुतार, निवासी संपादक डॉ. सुशिल अग्रवाल तसेच राज्यभरातील मान्यवर व पुरस्कार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संपादक सुरेशजी माडकर तर सूत्रसंचलन पंकजजी भिवटे यांनी केले. हा भव्य पुरस्कार सोहळा दिनांक २७ मे २०२६ रोजी शाहूस्मारक भवन कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.रविकिरण बळे यांना प्राप्त झालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल बळे कुटुंबासह रुकडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

थोडे नवीन जरा जुने