अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
आलास (ता.शिरोळ) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने शुक्रवार दि.८ ते १४ मे अखेर अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
परमाब्धिकार प.पु.परमात्मराज महाराज( श्री क्षेत्र आडी) यांच्या कृपाशिर्वादाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा हा चौथा हरिनाम सप्ताह होत आहे. यानिमित्त काकड आरती,ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण,भजन,किर्तन,हरिजागर होणार आहे. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत दिप प्रज्वलन,विना पुजन,ध्वजपुजन,ग्रंथपुजन,प्रतिमा पुजन होईल. दैनदिन कार्यक्रमामध्ये पहाटे ५ ते ६ काकड आरती,सकाळी ८ ते ११ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण,दुपारी १ ते ४ सामुहिक महिला भजन,सांयकाळी ५ ते ६ हरिपाठ,सांयकाळी ७ ते ९ हरिकिर्तन, रात्री १० नतंर हरिजागर होईल.
सप्ताहामध्ये शुक्रवार दि.८ रोजी दुपारी १ वाजता एकादशी महिला भजनी मंडळ,आलास यांचे भजन व हरिपाठ, सांयकाळी ७ वाजता इचलकरंजीचे ह.भ.प.बाळासो माने महाराज यांचे किर्तन,रात्री १० वाजता श्री विश्वकर्मा भजनी मडंळ,आलास यांचे भजन होईल.
शनिवार दि.९ रोजी कवठेगुलंद- औरवाड येथील माऊली महिला भजनी मंडळ यांचे भजन व हरिपाठ,महे (ता.करवीर) चे ह.भ.प.विठ्ठल गावडे महाराज यांचे किर्तन,आलास येथील श्री हनुमान भजनी मंडळ यांचे भजन होईल.रविवार दि.१० रोजी घालवाड येथील श्री राम महिला भजनी मंडळ यांचे भजन व हरिपाठ,देवाची आळंदी येथील ह.भ.प.योगेश जाधव महाराज यांचे किर्तन,सांगली येथील श्री शिवसंत भजनी मंडळ यांचे भजन होईल.सोमवार दि.११ रोजी शिरोळ येथील विठुमाऊली महिला भजनी मंडळ यांचे भजन व हरिपाठ,पंढरपुर येथिल संत कबीर महाराजांचे वंशज ह.भ.प.संत भागवत कबीर यांचे किर्तन,आलास येथील श्री विश्वकर्मा भजनी मंडळ यांचे भजन होईल.
मंगळवार दि.१२ रोजी कवठेगुलंद गावभाग येथील अक्कमादेवी महिला भजनी मंडळ यांचे भजन ,हरोली येथील जगतगुरु श्री तुकाराम महाराज महिला मंडळ यांचे हरिपाठ ,संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज गुरुवर्य ह.भ.प.चैतन्य महाराज देहुकर यांचे किर्तन,आम्ही भजन वेडे ग्रुप यांचे सोंगी भजन (भारुड) होईल.
बुधवार दि.१३ रोजी आलास येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यांच्यावतीने दिंडी सोहळा व रिंगण सोहळा होईल.सांयकाळी ७ वाजता माळखंबी येथील ह.भ.प.भगवान चव्हाण महाराज यांचे किर्तन,रात्री १० वाजता आलास येथील श्री हनुमान भजनी मंडळ यांचे भजन होईल.
गुरुवार दि.१४ रोजी सकाळी ८ वाजता पारायण सांगता,सकाळी १० वाजता इचलकरंजी येथील ह.भ.प.बाळासो माने महाराज यांचे काल्याचे किर्तन,दुपारी १२ वाजता महाप्रसाद होईल.
सर्व कार्यक्रम आलास येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होतील. सप्ताह सोहळ्यासाठी व्यासपीठ चालक म्हणुन अकिवाटचे ह.भ.प.महादेव वाळके व मजरेवाडीचे ह.भ.प.संजय काटे आहेत.काकड आरतीसाठी उदगावचे ह.भ.प.ओकांर तनपुरे,ह.भ.प.अशोक कदम,अकिवाटचे ह.भ.प.गजानन कदम,ह.भ.प.पोपट लाटवडे आहेत.
आम्ही भजन वेडे ग्रुप शिरोळ तालुका यांची साथ संगत असुन मृदुंग मणी मजरेवाडीचे ह.भ.प.शितल चव्हाण,शिरढोणचे ह.भ.प.कुमार जाधव यांच्याकडे आहे.तसेच मजरेवाडीचे ह.भ.प.शितल चव्हाण,ह.भ.प.संजय काटे,कुरुंदवाडचे ह.भ.प.किशोर भाट यांची गायन साथ आहे.सप्ताहाकाळात ह.भ.प.राजाराम निडगुंदे चोपदार असुन ह.भ.प.वसंत जाधव,ह.भ.प.रायमाने महाराज विणेकरी आहेत. आलास,अकिवाट,मजरेवाडी,हेरवाड,शिरढोण,तेरवाड, नांदणी,हरोली,उदगाव,कुरुंदवाड,बुबनाळ,कवठेगुलंद, गणेशवाडी या सर्व गावातील भजनी मंडळाची टाळ साथ असणार आहे.काकड आरतीस येणार्या महिलांना पैठणी साडी बक्षिस म्हणुन देण्यात येणार आहे. तरी अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
