Top News

राजू खिचडे "कन्नड नुडी" पुरस्काराने सन्मानित..

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

     कारदगा ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष ,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ,तिसऱ्या आघाडीचे प्रमुख व शेतकरी संघटनेचे नेते राजू कुमार खिचडे (सर) यांना रामदुर्ग तालुक्यातील शिरसंगी येथे "समाजसेवा ट्रस्टच्या" वतीने "समाजसेवा कन्नड नुडी " पुरस्काराने महामुनींच्या प्रमुख उपस्थितीत व सौ.जमुना प्रदीपकुमार पट्टण दाम्पत्यांच्या शुभ हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

       शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबरोबर,राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रात राजू खिचडे यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्य केले आहे.निपाणी तालुक्यातील कारदगा येथे जिल्हा पातळीवर सीमाभागात "कन्नड साहित्य संमेलन"भरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. राजकारण सामाजकारण, शैक्षणिक क्षेत्रात हि त्यांच्या पुढाकार मोलाचा असतो.आशा या सर्व कार्याचा आढावा घेऊनच रामदुर्ग तालुक्यातील शिरसंगी येथे त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याने पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक केले जात आहे.

 याबाबत बोलताना राजू खिचडे म्हणाले की आज पर्यंत केलेल्या कामाची ही पोहच पावती आहे .या पुरस्कारामुळे समाज कार्यासाठी झटत राहणार असल्याचे सांगितले.

थोडे नवीन जरा जुने