Top News

बोरगाव अरिहंत संचलित आय टी आय कॉलेज येथे शुक्रवार 29 मे रोजी भव्य रोजगार मेळावा



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळावी व त्यातून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावे या हेतूने बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाच्या श्री आर. ए .पाटील औद्योगिक केंद्र मार्फत गेल्या सात वर्षांपासून रोजगार मेळावा भरविण्यात येत आहे. 2025 रोजी भरविण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे 500 हून अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्या निवड झाली .यंदाही भव्य प्रमाणात येत्या 29 मे 2026 रोजी रोजगार मेळावा भरविण्यात येत असून सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन शाळेचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील यांनी केले. 

आज बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत माहिती देताना ते म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण मिळावे या हेतूने स्वर्गीय रावसाहेब पाटील यांनी बोरगाव येथे आर ए पाटील आयटीआय केंद्राची निर्मिती केली. त्याच माध्यमातून आज अनेक युवक मोठ मोठ्या कंपनीत काम करीत आहेत. शहरी भागात भरविण्यात येणारा रोजगार मेळावा ग्रामीण भागातील भरविण्यात यावे व येथील विद्यार्थ्यांना मोठ्या कंपनीत रोजगाराची संधी मिळावी या येथूने गेल्या सात वर्षापासून आपण कार्य करीत आहोत. यंदाही सुमारे 30 हून अधिक मोठे कंपनी या रोजगारा मेळाव्यात येणार आहेत. दहावी, बारावी ,आयटीआय, डिप्लोमा, इंजीनियरिंग व पदवीधर युवकांनी यात सहभाग घेऊन आपले उज्वल भविष्य घडवावे. असे सांगितले. 

कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील म्हणाले, आयोजित उद्योग व रोजगार मेळाव्यातून थेट मुलाखतीतून नोकरीची संधी मिळणार आहे. नोकरी शोधणाऱ्यांनी या मेळाव्यात सहभाग घेऊन आपले भविष्य घडवावे. अरिहंत उद्योग समूह नेहमीच समाजकार्यासाठी प्राधान्य देत आहे .या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी रोजगार मेळावा भरवीत असून सर्वांनी उपस्थित रहावे असे सांगितले.

 याप्रसंगी शाळेचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील, श्री अरिहंत को आप क्रेडिट सोसायटी चे चेअरमन श्री अभिनंदन पाटील, आय टी आय कॉलेज चे सीईओ बाळासाहेब हावले ,प्राचार्य विद्याधर शिरहट्टी, विक्रम घाटगे आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने