Top News

आईच्या मायेचे जिवंत उदाहरण – बरगी धरणातील व्हायरल व्हिडिओने डोळे पाणावले

हैदर‌अली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

सध्या सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक आई आणि तिचे लहान मूल दिसत असून, आई आपल्या मुलावर रागावते, त्याला ओरडते; मात्र पुढच्याच क्षणी ती त्याला आपल्या कुशीत घट्ट धरून ठेवते. हा व्हिडिओ आईच्या निस्वार्थ प्रेमाचा आणि मायेचा जिवंत नमुना ठरत आहे.

ही घटना मध्यप्रदेशातील बरगी धरण येथे घडल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी घडलेली घटना आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला असून, अनेकांनी त्यावर भावना व्यक्त केल्या आहेत.

व्हिडिओमधून एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते की, आई आपल्या मुलांना कितीही रागावली, शिक्षा केली तरी तिच्या मनात त्यांच्या विषयी अपार प्रेम आणि काळजीच असते. कोणत्याही परिस्थितीत आई आपल्या लेकरांना स्वतःपासून दूर जाऊ देत नाही, ही भावना या घटनेतून प्रकर्षाने जाणवते.

या व्हिडिओमुळे समाजात आईच्या प्रेमाची पुन्हा एकदा जाणीव झाली असून, अनेकांनी “आई म्हणजे माया, आई म्हणजे आधार” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, तज्ञांच्या मते, पालकांनी मुलांवर प्रेम करताना त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, संयमाने वागणे आणि त्यांच्या भावनांची कदर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

थोडे नवीन जरा जुने