कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड येथील नवभारत शिक्षण मंडळ संचालित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या शैक्षणिक संस्थेचा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल ९५.६२ %इतका लागला. यामध्ये कला शाखेतील विद्यार्थीनी कु.कामाक्षी परसराम कांबळे यांने राज्यशास्त्र विषयात १०० पैकी ९७ गुण मिळवून बोर्डामध्ये प्रथम तर वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी समीक्षा बडबडे हिने चिटणीसाची कार्यपद्धती या विषयात१०० पैकी ९८ गुण मिळवून बोर्डात प्रथम क्रमांक पटकाविला.घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयामार्फत कौतुक करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातून महाविद्यालयाचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यामध्ये अनुक्रमे विज्ञान विभाग ९९.५७ टक्के,कला विभाग८८.६६टक्के व काॅमर्स विभागाचा निकाल ९६.७७ टक्के लागला. तर महाविद्यालयामध्ये विज्ञान विभागात ऋग्वेद रवींद्र दबडे
(७८.८३ %)प्रथम क्रमांक , लक्ष्मी राजेंद्र सोलापूरे (७८.५०%) द्वितीय क्रमांक, असीन फैजुलखान मोकाशी (७५.००%) टक्के गुण घेत तृतीय क्रमांक मिळवला.
कला विभागामध्ये कामाक्षी परशराम कांबळे (८७.१७%)टक्के प्रथम क्रमांक, आदित्य बाबासो कांबळे (८६.१७%) व्दितीय, अंकिता विनायक इंगळे (७६.१७%) गुण घेत तृतीय क्रमांक मिळवला.
वाणिज्य विभागामध्ये मंदार दीपक कांबळे (९०.८३ %) प्रथम क्रमांक, समीक्षा संजय बडबडे (९०.६७ %)व्दितीय क्रमांक अनुजा रावसाहेब मिरजे हिने (८१.५०%) इतके गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.आर .जे पाटील यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत बोर्डामध्ये क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या सर्व यशामागे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. गणपतदादा पाटील ,संस्थेचे संचालक श्री .गौतम पाटील ,उपसंचालक श्री. डी एस माने,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.रावसाहेब पाटील, सदस्य श्री.देवराज मगदूम , सदस्या श्रीमती.विनिया घोरपडे, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.आर जे पाटील यांचेसह सर्व, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे
