Top News

हवेतील गारव्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्याना थोडासा दिलासा

अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यात पाऊस नसला तरी गेले दोन दिवस   सांयकाळनतंर ढगाळ वातावरण होवुन हवेत गारवा निर्माण होत आहे.यामुळे दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना हवेतील गारव्यामुळे थोडासा दिलासा मिळत आहे.

 शिरोळ तालुक्यात  अतिउष्माने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी दहा वाजल्यापासुन  घामाच्या धारा वाहत आहेत.दुपारच्यावेळी तर उष्णतेचा कहर बरसतो आहे.यामुळे प्रत्येकाच्या घरी रांत्रदिवस पंखे,वातानुकुलित एसी,कुलर सुरु आहेत. असा उन्हाळा कधी पाहीला नव्हता असे प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळत आहे.

 मात्र,  शिरोळ तालुक्यात गेले दोन दिवस दुपारच्यावेळी जोरदार वादळी वारे सुटत आहे. सांयकाळच्यावेळी ढगाळ वातावरण होवुन हवेत गारवा निर्माण  होत आहे.अवकाळी पाऊस बरसेल असे प्रत्येकाला वाटत आहे. जिल्ह्यातही बहुतांशी भागात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस होत आहे. मात्र शिरोळ तालुक्यात  पाऊस हुलकावणी देत आहे.दरम्यान पाऊस नसला तरीही  सांयकाळनतंर हवेतील गारव्यामुळे दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळत आहे. दरम्यान तालुक्यातील  शेतकरीवर्ग एका जोरदार,मुसळधार अवकाळी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

थोडे नवीन जरा जुने