अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
गौरवाड (ता.शिरोळ) येथील Only क्रिकेट क्लब तर्फे आयोजीत गौरवाड प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साहेब प्रेमी संघ विजेता तर जेएम सुपरकिंग संघ उपविजेता ठरला.
गौरवाड प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे.यामध्ये एकुण आठ संघाने सहभाग घेतला होता. विजेत्या साहेब प्रेमी संघाचे संघमालक चेतन उगारे तर जेएम संघाचे संघमालक जुनेद मुल्ला होते.तसेच एसडी वाॅरियर्स संघाने तृतीय क्रमांक पटकावला.याचे संघमालक समीर सय्यद व दादु कांबळे होते.गौरवाड किंग्जने चौथा क्रमांक पटकावला.याचे संघमालक कमलेश माने ,ऋषिकेश हुलवान होते.
विजेत्या संघाना अनुक्रमे रोख ७००१,५००१,३००१,२००१ रुपये बक्षिसे व ट्राफी देण्यात आली. वैयक्तिक पुरस्कारामध्ये जेएम सुपरकिंग्जचे इस्माईल जमादार हे मालिकावीर ,गौरवाड किंग्जचे नुरैन पटेल बेस्ट बॅटसमन,ऋषिकेश हुलवान बेस्ट बाॅलरचे मानकरी ठरले. साहेबप्रेमी संघाचे राहुल कुंभोजे हे मॅन आँफ दि मॅचचे मानकरी ठरले.
सर्व सामन्यात पंच म्हणुन अजित कुंभोजे,संदिप कांबळे यांनी काम पाहीले.सामन्याचे थेट समालोचन जावेद पटेल,प्रशांत कुंभोजे,प्रणिल भिर्डे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले.
सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरत शेडबाळे,तौसिफ जमादार,धनराज बन्ने,आण्णासो कुंभोजे,शाहिद मुल्ला यांच्यासह सर्व सदस्यानी विशेष परिश्रम घेतले. पुरस्कार प्रदान करताना भाजपा युवा मोर्चा शिरोळ मंडल अध्यक्ष प्रशांत राजश्री महावीर कुंभोजे यांनी सर्व खेळाडू, प्रेक्षक, प्रायोजक व स्वयंसेवकांचे आभार मानले. "GPL ने गावात एकी व बंधुभाव वाढवला," असेही ते म्हणाले.

