Top News

9 मे रोजी बोरगाव येथे प्रकाश भागाजे यांचे व्याख्यान ; 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन.



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

सहकार क्षेत्रात अल्पावधीतच नाव लौकिक ठरलेल्या बोरगांव येथील श्री जिनलक्ष्मी सोसायटीच्या वतीने दहावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व नव्याने दहावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन येत्या शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी संस्थेच्या परिसरात संपन्न होणार असल्याचे माहिती संस्थापक सागर मिरजे व अध्यक्ष अजित पाटील यांनी दिले आहे.

   हा प्रबोधन कार्यक्रम शनिवारी दुपारी ३ वाजता संस्थेच्या कार्यालयात पार पडणार असून, यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रकाश भागाजे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा मोठा लाभ होणार आहे.

    श्री जिनलक्ष्मी सोसायटी कडून सहकार क्षेत्र बरोबर सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येत असून आज ही संस्था परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रेरणा निर्माण व्हावी आणि गुणवंतांचा सन्मान होऊन इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.. गुणी विद्यार्थ्यांचा सन्मान व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी, पालकांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक चेअरमन सागर मिरजे व अध्यक्ष अजित पाटील यांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने