Top News

विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी जिद्द अंगीकरणे महत्त्वाचे : प्रकाश भागाजे

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

        आजच्या मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील ज्ञान घेऊन न थांबता व्यवहार ज्ञान, सकारात्मक विचार आणि ध्येय पूर्तीसाठीची जिद्द अंगीकारणे आवश्यक आहे. विद्यार्थी जीवनातील दहावीचा टप्पा हा भविष्यातील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या काळात घेतलेले योग्य निर्णय आणि केलेली मेहनत आयुष्याला नवी दिशा देऊ शकते, असे मत नामवंत व्याख्याता प्रकाश भागाजे यांनी केले. ते बोरगांव येथील आर बी हॉटेल येथे आयोजित श्री जीन लक्ष्मी संस्थेच्या वतीने गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

     कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन ने करण्यात आली. बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्था, संचलित विद्यासागर कन्नड, इंग्लिश,श्री अरिहंत शाळा चे मराठी,कन्नड,व इंग्लिश मीडियम, के एस पाटील हायस्कूल मराठी व कन्नड भाषेत उत्तीर्ण दहावी गुणी विद्यार्थ्यांचा व व्यासपीठा वरील मान्यवरांचा श्री जिन लक्ष्मी संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून संस्थापक सागर मिरजे हे होते.

          पुढे बोलताना श्री प्रकाश भागाजे म्हणाले की गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचे कार्य जिनलक्ष्मी सहकारी संस्था करत आहे, हे समाजासाठी आदर्शवत आहे, विद्यार्थ्यांनी स्वतःतील क्षमता ओळखून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असा संदेश भागाचे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

    यावेळी जीन लक्ष्मी संस्थेचे चेअरमन श्री अजित पाटील म्हणाले की विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना या कार्यक्रमामुळे एक नवी प्रेरणा मिळाली असून, हा सत्कार सोहळा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणार असे सांगितले.

        यावेळी संस्थापक श्री सागर मिरजे म्हणाले की आमची संस्था आर्थिक विकास सोबत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात मदत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

   या कार्यक्रमास व्याख्याते प्रकाश भागाजे सर, जिनलक्षमी सौहार्द सहकारी संघाचे संस्थापक सागर मिरजे, चेअरमन अजित पाटील, संचालक निलेश पाटील, प्रकाश पाटील, उदय पाटील,प्रवीण हावले, बहुबली पाटील, सुदर्शन खिचडे ,बाहुबली खेमलापुरे धनंजय खेमलापुरे, पोपट चौगुले, राजेंद्र बाबू गंगाई सर, नरसु जूगळे, गणेश नाजरे ,अमर सातपुते,किरण नरवाडे, सह जीन लक्ष्मी संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग,सभासद, विद्यार्थी,पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन अजित पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन बशीर मुजावर यांनी केले तर आभार इंडी सर यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने