अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव सह परिसरातील शेतकरी, सभासद आणि लघुउद्योजकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आचार्य श्री 108 शांतीसागर को-ऑप सोसायटीला मार्च 2026 अखेर 4 लाख 82 हजार रुपयांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,व हालशुगरचे संचालक श्री शरद जंगठे यांनी दिली.
बोरगाव येथील संस्थेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद जंगठे म्हणाले की संस्थेने पारदर्शक व शिस्तबद्ध कारभार करत ठेवीदारांचा विश्वास संपादन केला आहे. चालू आर्थिक वर्षात संस्थेचे भाग भांडवल - 13 लाख 99 हजार 650 रुपये , ठेवी -10 कोटी 64 लाख 40 हजार 658 रुपये, गुंतवणूक 3 कोटी 88 लाख 98 हजार 618 रुपये.,तसेच विविध बँक, संस्था यामध्ये बचत व चालू खात्यावरील शिल्लक 62 लाख 63 हजार 646 रुपये कर्ज वाटप- 6 कोटी 49 लाख 18 हजार 425 रुपये , अहवाल सालात मार्च 2026 अखेर 4 लाख 82 हजार इतका ढोबळ नफा झाला असून वास्तविक निव्वळ नफा 3 लाख 46 हजार 699.40 रु झालेला आहे,संस्थेची मुख्य कार्यालय सह मानकापूर येथे एक शाखा कार्यरत आहे, बेडकिहाळ व मांगूर या दोन्ही ठिकाणी शाखाना मंजुरी मिळाली असून लवकरच उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.
यावेळी जनरल मॅनेजर वैभव कुंभार यांनी सांगितले की आपल्या लोकप्रिय बँकेत सभासदांना विविध कर्ज योजना, ठेवी तसेच सोने तारण कर्ज आणि स्वसहाय्य गटांना वित्तपुरवठा, RTGS ,NEFT सारख्या सुविधा संस्थेमार्फत दिल्या जात आहेत.
या पत्रकार परिषदेस संस्थापक अध्यक्ष श्री शरद जंगठे, उपाध्यक्ष राजशेखर हिरेमठ, संचालक शीतल अम्मनावर, डॉ महावीर बंकापुरे, सुनिल गोरवाडे, अक्षय चौगुले,अर्जुन हुडेद, प्रकाश पाटील,,धवल भिवरे, भूपाल महाजन,सौ पद्मश्री जितू पाटील,सौ भारती सातपुते सह कर्मचारी उपस्थितीत होते.
