अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
गणेशवाडी (ता.शिरोळ) येथील लोकसेवा संघ वाचनालयातर्फे मंगळवार दि.५ ते ३१ मे अखेर विद्यार्थ्याकरिता वक्तृत्व (भाषण),अभिवाचन,संवाद,लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशवाडी येथील लोकसेवा संघ वाचनालयातर्फे प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांकरिता विविध उपक्रम राबविले जातात.यानुसार यावर्षी
विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासासाठी मराठी भाषेत हस्ताक्षर सुधारणा, अभिवाचन कसे करावे, विविध ठिकाणी आपण बोलताना कसे बोलावे,त्यासाठी विविध विषयांचे वाचन करून घेणे.
संवाद कसा करावा, व्यासपीठावर बोलण्याचे धाडस, बोलण्याचा सराव विद्यार्थ्यांकडुन करवुन घेतला जाणार आहे.यासाठी विविध नामवंत वक्ते ,प्रशिक्षक,लेखक, कलाकार, विविध विषयातील तज्ञ या उपक्रमात सहभागी होवुन मार्गदर्शन करणार आहेत. एका महिन्यात मुलांना व्यासपीठावर हमखास बोलण्याचे धाडस निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे.या साठी प्रवेश फी प्रती विद्यार्थी १००० रुपये आहे. कोणत्याही वयो गटातील मुले - मुली यामध्ये सहभाग घेऊ शकतात. कार्यशाळेची वेळ सकाळी १० ते ११ असून आवश्यकते नुसार वेळ वाढविण्यात येईल. तरी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन लोकसेवा संघा कडून करण्यात आले आहे.
