Top News

जयसिंगपुरात घरफोडी; सोन्या-चांदीसह ३९ हजारांचा ऐवज लंपास

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

जयसिंगपूर शहरातील हनुमान मंदिराजवळील गल्ली क्रमांक ६ येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ३९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत श्रीमती शांता रमेश बिरादार (वय ४२, रा. गल्ली नं. ६, हनुमान मंदिराजवळ, जयसिंगपूर) यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत फिर्यादी आपल्या घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने घराचे मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील तिजोरीचे लॉक तोडून त्यामधील २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ४ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने तसेच १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस नाईक कोळी यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

थोडे नवीन जरा जुने