Top News

पंचगंगा नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळला; कुरुंदवाड पोलिसांत नोंद

Ai

कुरूंदवाद / शिवार न्यूज नेटवर्क :

 शिरदवाड गावच्या हद्दीतील गारपीर दर्ग्याजवळील पंचगंगा नदीपात्रात एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. ताहीरा गौस सनदी (वय ४५, रा. कांरडे मळा, जकरिया मशिदीजवळ, शाहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचा मृतदेह शिरदवाड गावच्या हद्दीतील गारपीर दर्ग्याजवळ असलेल्या पंचगंगा नदीपात्रात आढळून आला. ही घटना ३१ मे रोजी सायंकाळी सात वाजण्यापूर्वी निदर्शनास आली.

याबाबत मयत महिलेचे भावोजी अब्बास फरीद सनदी (वय ५८, रा. माळभाग फडी चौक, अब्दुललाट, ता. शिरोळ) यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात येऊन वर्दी दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कोळी करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने