Top News

हेरवाड येथे श्री गुरुचरित्र व परमाब्धि ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन




हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथील हेरवाड गावात परमाब्धिकार प. पू. परमात्मराज महाराज (श्री क्षेत्र आडी) यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्री गुरुचरित्र व परमाब्धि ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याचे यंदाचे चौथे वर्ष असून पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

शनिवार दि. १६ मे २०२६ ते रविवार दि. २४ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत पारायण होणार आहे. या पारायणासाठी व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. श्री. प्रकाश शिंदे व ह.भ.प. श्री. गुरु वाडीकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

रविवार दि. २४ मे रोजी दुपारी १२.३० वाजता परमाब्धिकार प. पू. परमात्मराज महाराज यांचे आगमन होणार असून त्यानंतर पाद्यपूजा व दर्शन सोहळा पार पडणार आहे. दर्शन सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा संपूर्ण धार्मिक कार्यक्रम हेरवाड येथील श्री हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या पारायण सोहळ्यात सहभागी होऊन वाचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी पंचक्रोशीतील सर्व भाविकांना केले आहे.

ज्या भक्तांना पारायणासाठी बसायचे आहे त्यांनी आपली नावे सौ. मुक्ता पुजारी (मो. ७०५८८०४१४२) किंवा सौ. सिमा बरगाले (मो. ९३२२६८९९२२) यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने