बोरगाव :
बोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ राजकीय नेते तसेच ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष जयपाल भूपाल हवले यांचे शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने बोरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.
जयपाल हवले हे मनमिळाऊ, शांत व सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. ग्रामपंचायत अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी गावातील विविध विकासकामांना प्राधान्य देत अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले. कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी ग्रामविकासासाठी कार्य केले. त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ अनेकांना झाला होता.
राजकीय, सामाजिक आणि ग्रामविकास क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या निधनामुळे गावाने एक अनुभवी व अभ्यासू नेतृत्व गमावल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता बोरगाव येथे होणार आहे.
