कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढू लागला आहे. यामध्ये नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुंरुंदवाड हे विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत असून महाविद्यालय परिसरात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि स्पर्धात्मक शिक्षण देण्याची परंपरा जपणाऱ्या या महाविद्यालयाने यंदाही आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अलीकडे जाहीर झालेल्या इयत्ता बारावी (H.S.C.) परीक्षेच्या निकालामध्ये महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये महाविद्यालयाविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेले उज्ज्वल यश हे संस्थेच्या दर्जेदार अध्यापनाची आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाची साक्ष देणारे ठरत आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. तज्ज्ञ प्राध्यापकांकडून नियमित मार्गदर्शन, शंका निरसन, अभ्यास नियोजन आणि करिअर काउन्सिलिंग यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जात असल्याचे पालकांनी सांगितले. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना या महाविद्यालयामुळे उच्च शिक्षणाची नवी दिशा मिळाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज आणि स्वतंत्र प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन, JEE, CET आणि NEET परीक्षांची तयारी, संगणक सुविधा, आधुनिक अध्यापन पद्धती आणि नियमित टेस्ट सिरीज यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध होत आहे. याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग आणि शिष्यवृत्ती संदर्भातील मार्गदर्शनही दिले जाते.
विशेष म्हणजे मुलींसाठी स्वतंत्र सुविधा, सुरक्षित व सुंदर कॅम्पस, स्वच्छता, आर.ओ. फिल्टरयुक्त पिण्याचे पाणी, शिस्तबद्ध वातावरण आणि पालकांशी नियमित संपर्क या बाबींमुळे पालकांचा संस्थेवर मोठा विश्वास बसला आहे. मुलींसाठी मोफत एस.टी. पास योजना उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळत आहे.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच महाविद्यालय क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातही आघाडीवर आहे. एन.सी.सी., राष्ट्रीय सेवा योजना (NSS), विविध सामाजिक उपक्रम, व्याख्यानमाला, माजी विद्यार्थी मेळावे तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग पाहायला मिळतो. अलीकडेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालयाचा लौकिक अधिक वाढला आहे. गोवा येथे होणाऱ्या मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्याची निवड तसेच केरळ येथे होणाऱ्या १० मीटर एअर रायफल शूटिंग राष्ट्रीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्याने मिळवलेले यश हे संस्थेच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाचे प्रतीक मानले जात आहे.
महाविद्यालयाच्या आकर्षक व शैक्षणिक वातावरणामुळे यंदा प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होताच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. परिसरातील अनेक गावांमधून विद्यार्थी आणि पालक महाविद्यालयाला भेट देत असून प्रवेशासाठी उत्सुकता वाढताना दिसत आहे. “शिस्त, गुणवत्ता, सुरक्षितता आणि वैयक्तिक मार्गदर्शन म्हणजेच श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय,” अशी भावना अनेक पालक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, मर्यादित प्रवेश क्षमता लक्षात घेता विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची नवी दिशा देणारे आणि गुणवत्तेची परंपरा जपणारे श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुंरुंदवाड हे यंदाही अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
