Top News

अरिहंत उद्योग समूहातर्फे निपाणी समाधीमठ गोशाळेस पाच टन चाऱ्याची देणगी

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जनावरांसाठी चारा व पाण्याची टंचाई निर्माण झाली असून अनेक ठिकाणी जनावरांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहातर्फे निपाणी येथील समाधीमठ गोशाळेस पाच टन चाऱ्याची देणगी देण्यात आली.

दक्षिण भारत जैन सभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या प्रेरणेतून निपाणी भागातील युवा नेते उत्तमराव पाटील यांनी हा उपक्रम राबविला. त्यांनी समाधीमठाचे मठाधिपती परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजी यांच्याकडे चारा सुपूर्द करून गोशाळेची पाहणी केली.

यावेळी बोलताना उत्तमराव पाटील म्हणाले, “समाधीमठात प्राणलिंग स्वामीजी यांनी गोमातेच्या जतन व संवर्धनासाठी सुरू केलेली गोशाळा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि गोसेवेची भावना जपत प्रत्येकाने अशा कार्यात सहभागी व्हावे.

परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजी म्हणाले, “देशभरात गोमातेची संख्या कमी होत असून तिच्या संरक्षणासाठी प्रत्येक हिंदूने पुढे येणे गरजेचे आहे. अरिहंत उद्योग समूहाने गोशाळेतील गाईंकरिता पाच टन चाऱ्याची देणगी देऊन मोठे सहकार्य केले आहे.

कार्यक्रमाचे स्वागत सागर श्रीखंडे यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक दिलीप पठाडे, दत्ता नाईक, अनिल संकपाळ, शिरीष कमते, इमरान मकानदार, पप्पू शिंदे, सुरज राठोड, आकाश माने, सचिन खोत, विनोद मगदूम, कृष्णात देसाई यांच्यासह अरिहंत परिवाराचे पदाधिकारी व मठाचे कर्मचारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने