अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव पठण पंचायतमध्ये स्वर्गीय सहकार नेते रावसाहेब पाटील दादा यांच्या प्रेरणेतून समाज कारणाला प्राधान्य देत, कार्यरत असलेले युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील (अण्णा) यांनी निवडणुकीच्या काळात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याचे दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवत समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत समस्त बोरगाव मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
पठण पंचायत बोरगावमध्ये दुसऱ्या सत्रातील उपनगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होते. यापूर्वी या पदावर भारती वसवाडे यांची निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ 29 एप्रिल 2026 रोजी संपल्यानंतर 30 एप्रिल रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत मुस्लिम समाजातील नगर सेविका रुकसाना बाळासाहेब अफराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्या बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवडून आल्या.
निवडणुकीच्या काळात उत्तम अण्णा पाटील यांनी “मुस्लिम समाजालाही योग्य प्रतिनिधित्व मिळवून देऊ” असा शब्द समाजाला दिला होता. तो शब्द त्यांनी कृतीतून पाळला. राजकारणासोबत समाजकारणाला अधिक महत्त्व देत मुस्लिम समाजाला नगर पंचायत च्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगराध्यक्ष पदानंतर उपनगराध्यक्ष पदासारखे महत्त्वाचे पद मुस्लिम समाजाला मिळाल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने उत्तम अण्णा पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभ वेळी सिकंदर अफराज, पिंटू माळी,फारुख मुजावर, बाळू अफराज, बाशू अफराज, रफिक अफराज, सलीम अफराज, खाजा मकानदार, इरफान मकानदार, मोशीन मकानदार, हिम्मत अफराज, यांच्यासह मुस्लिम समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
