Top News

अर्जुनवाडच्या सुपुत्राची झेप; एमपीएससीतून गौरव डोंगरे महसूल सहाय्यक पदावर निवड



अर्जुनवाड / शिवार न्यूज नेटवर्क : 

अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील सुपुत्र गौरव राहुल डोंगरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत महसूल सहाय्यक या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून धनगर समाजासाठी ही अभिमानाची व प्रेरणादायी बाब ठरली आहे.

    सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर गौरव यांनी हे यश संपादन केले. अनेक तरुणांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला असून “परिस्थिती कशीही असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर यश निश्चित मिळते” हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.गौरव डोंगरे यांच्या या यशामुळे अर्जुनवाड गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले आहे.यशामागे आजोबा मारुती डोंगरे,,वडील राहुल डोंगरे,काका अमोल डोंगरे, मामा गजानन करे, रामदास करे तसेच सहकार्य 

उमेश कुदळे, रयत प्रबोधिनी पुणे संस्थेचे सर्व शिक्षक वृंद यांचे महत्व पूर्ण योगदान लाभले. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. धनगर समाजातील तरुणांनी त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षांकडे वळावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

थोडे नवीन जरा जुने