Top News

सीदनाळ येथे सामाजिक एकता परिषद व गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :  

        सीदनाळ (ता. निपाणी) येथे त्यागमूर्ती माता रमाई महिला मंडळ व पंचशील तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक एकता परिषद व गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. समाजात एकात्मता वाढविणे तसेच गुणवंत विद्यार्थी, समाज पुरस्कार विजेते व देशसेवेसाठी आर्मीमध्ये भरती झालेल्या जवानांचा गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निपाणी भागचे युवा नेते व दिन दलितांचे आधारवड, सहकारत्न उत्तम रावसाहेब पाटील होते. उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष उत्तम दादा कांबळे हे होते. एडवोकेट सुखदेव वराळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहिले.

यावेळी महेश धम्म रक्षित, प्रा. डॉ. रवींद्र दिवाकर, बोरगावचे नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सिद्धनाळ व परिसरातील गुणवंत विद्यार्थी, समाज पुरस्कार प्राप्त व्यक्ती तसेच आर्मीमध्ये निवड झालेल्या जवानांचा सन्मान करून त्यांचे कौतुक करण्यात आले.

सामाजिक एकता परिषद च्या विचार मंच वरून बोलताना उत्तम पाटील म्हणाले की या समता परिषद च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजात शिक्षण, एकता व प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

      यावेळी उत्तम दादा कांबळे यांनी समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्याचा आपण अभ्यास केला पाहिजे,थोर महापुरुष यांची सामाजिक चळवळ,त्याचे मौलिक विचार आत्मसात केले पाहिजे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला भारतीय संविधान सारखे पवित्र ग्रंथ दिले आहेत.यामाध्यमातून आपण वाटचाल करणे ही काळाची गरज आहे असे मत श्री उत्तम दादा कांबळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास सिदनाळ, अकोळ परिसरातील आजी-माजी ग्राम पंचायत सदस्य,पदाधिकारी, तसेच परिसरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने