Top News

बोरगाव येथील मराठा समाजाला जागा मंजुरीसाठी काँग्रेस शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : 

     बोरगाव शहरातील मराठा समाजासाठी जागा मंजूर करण्यात यावी, या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने काँग्रेस जिल्हा अध्यक्ष व बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, चिकोडी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रोहन साळवे. निपाणी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश कदम,यांच्यासह तालुक्यातील सर्वच काँग्रेस नेते मंडळींनी आज बेळगाव येथे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन दिले.

     यावेळी लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले की बोरगावच्या मराठा समाजाच्या जागेचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे .मुख्यमंत्री सिध्दरामय्या ,जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी, खासदार प्रियंका जारकीहोळी यांना भेटून लवकरच बोरगावच्या मराठा समाजाला जागा मंजुरी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

       याप्रसंगी अण्णासाहेब हावले म्हणाले,मराठा समाजासाठी समुदाय भवन नसल्यामुळे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अडचण निर्माण होत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरुढ पुतळा, उद्यान ,समुदाय भवन होणार असून सर्व्ह नंबर 729 /1 अ /1 अ मधील 2 एकर 10 गुंठे जागा मंजूर झाल्यास शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला जागा मंजूर व्हावी यासाठी सर्वांचे प्रयत्न असून, प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून मराठा समाजासाठी जागा मंजूर करावी अशी मागणी केली

          यावेळी काँग्रेस नेते रोहन साळवी व राजेश कदम यांनी बोलताना म्हणाले की निपाणी नंतर बोरगांव हे मोठे शहर असून याठिकाणी मराठा समाजाची संख्या वाढत चालली आहे. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी जागेचा अभाव आहे, कर्नाटक सरकारने त्वरित निर्णय घ्यावा व मराठा समाजाला जागा मंजूर करावी असे आवाहन केले.

      या वेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, सकारात्मक निर्णय घेऊन बोरगाव येथील मराठा समाजाला जागा देण्याबाबत आपण शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवून लवकरात लवकर मोजणी करून जागा देण्याबाबत प्रयत्न करू .पुढील आठवड्यातच प्रांताधिकारी व तहसीलदार यांना त्या ठिकाणी पाठवून जागेसंबंधीत माहिती घेऊन स्थानिक चौकशी करून प्रस्ताव शासनाकडे पाठवू असे आश्वासन दिले.

         याप्रसंगी मराठा समाजाचे अध्यक्ष मारुती निकम, नगरसेवक रोहित माने पाटील, बाळासाहेब सातपुते ,बाबासाहेब निकम, एस. बी. पाटील, राजू उरणकर, अण्णासो पवार,नरसू गोटखिंडे उमेश वास्कर, चंदू पवार ,शिशिर सातपुते, अक्षय पवार यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने