Top News

हेरवाड निरंक, अब्दुललाट २ जागेसाठी ८, हरोली १ जागेसाठी ७ तर औरवाड १ जागेसाठी १ अर्ज

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील औरवाड, अब्दुललाट, हेरवाड व हरोली ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत आरक्षणाच्या अटींमुळे उमेदवारांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याचे चित्र समोर आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार, दि. १३ एप्रिल हा अंतिम दिवस अखेर हेरवाड एका जागेसाठी निवडणूक सुरू असून एकही अर्ज दाखल झाला नाही. तर अब्दुललाट २ जागेसाठी प्रभाग १ मध्ये २ अर्ज व प्रभाग ५ मध्ये ६ अर्ज दाखल झाले आहेत. हरोली येथे १ जागेसाठी मोठी चुरस दिसून येत असून सात अर्ज दाखल झाले आहेत. औरवाड १ जागेसाठी १ अर्ज दाखल झाले आहे. औरवाड येथील प्रभाग क्रमांक ४ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या आरक्षणासाठी राखीव आहे. या जागेसाठी १ अर्ज दाखल झाले असून छाननी नंतरच बिनविरोधाचा मार्ग मोकळा होणार आहे. अब्दुललाट येथे प्रभाग क्रमांक ५ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) तर प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव आहे. .हेरवाड येथील प्रभाग क्रमांक २ हा अनुसूचित जमाती (महिला) आरक्षणासाठी राखीव असून या ठिकाणीही उमेदवारांचा अभाव दिसून येत आहे.

हरोली येथे सर्वसाधारण आरक्षण असलेल्या जागेसाठी ७ अर्ज दाखल झाले असून येथे निवडणुकीची हालचाल सुरू असल्याचे चित्र आहे. छाननी व माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

थोडे नवीन जरा जुने