Top News

शिवार न्यूजचे प्रल्हाद साळुंखे यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार

टाकळीवाडी / शिवार न्यूज नेटवर्क  : 

जनकार्य साप्ताहिक न्यूज चॅनलच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शिवार न्यूजचे प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सभापती श्रद्धाताई अविनाश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, पत्रकार समाजातील घडामोडींचे प्रतिबिंब जनतेसमोर मांडत असतात. त्यांच्या लेखणीतून समाजातील समस्या, अन्याय व घडामोडींना योग्य वाचा मिळते. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पत्रकारांनी निःपक्षपातीपणे, जबाबदारीची जाणीव ठेवून व समाजहित डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी जनकार्य साप्ताहिक न्यूज चॅनलच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या उत्तराताई विजीतसिंह शिंदे सरकार, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समिती सदस्य बाबासो वनकोरे, डॉ. राजीव जाधव, जनकार्यचे संपादक मारुती बिरणगे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने