Top News

बेडकिहाळ येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

        स्वराज्याचे जनक ,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,संत शिरोमणी महात्मा बसवेश्वर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून सीमाभागातील बेडकिहाळ येथील कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे  संस्थापक अध्यक्ष डॉ.विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वामध्ये देश भक्त रत्नापा  कुंभार सांस्कृतिक हॉल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

  कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ विक्रमसिंह जाधव, ब्रेन स्पेशालिस्ट मानसोपचार तज्ञ मिरज, डॉ. शर्वरी विक्रमसिंह जाधव भारती विद्यापीठ प्रमुख मिरज यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी भगवान महावीर,छ. शिवाजी महाराज,  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,  महात्मा बसवेश्वर ,महात्मा ज्योतिबा फुले, यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे यांनी केले. यावेळी  मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर 10 वी 12 वी मध्ये प्रथम द्वितीय तृतीय प्राप्त गुणवंत  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले. 

  यावेळी डॉ प्रकाश कदम सर म्हणाले की शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेली अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहे. रक्तदान शिबीर, महाआरोग्य शिबीराचे आयोजन, गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गरजु विद्यार्थ्यांचे शालेय फी भरणे, संगणक प्रशिक्षण मोफत देणे, गरजु महिलांना साड्या वाटप करणे, अनेक अनाथ आश्रमांना भेट देवुन अन्नधान्य, शालेय साहित्य, साड्या, आर्थिक मदत करणे, कवी संमेलन, मराठी साहित्य संमेलन भरवणे, व्रुक्षारोपण करणे, जेथे अन्याय होत असेल तेथे आंदोलन करणे गावातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी डॉ.विक्रम शिंगाडे नेहमी पुढाकार घेऊन कार्य करत असतात. तसेच सर्वात मोठा उपक्रम म्हणजे मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा दरवर्षी उत्साहात साजरा करत असतात असे अनेक उपक्रम ही संस्था राबवत असते. त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे.

  डॉ.विक्रमसिंह जाधव म्हणाले की डॉ.विक्रम शिंगाडे यांंचे कार्य सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे. डॉ विक्रम शिंगाडे यांच्या सारखे कार्य सर्वांनी केले तर समाजमध्ये नक्कीच प्रगती होइल.

  अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा.डॉ.अमर कांबळे म्हणाले की डॉ विक्रम शिंगाडे आज चार जोड्यांचे मोफत विवाह करुन देत आहेत. फक्त चार जोंड्यांचे नाही तर हजारो लोकांचे आशिर्वाद त्यांना लाभने सारखे पवित्र काम करत आहेत,आम्ही त्यांच्या संस्थेशी गेल्या सात आठ वर्षांपासून निगडित आहोत. त्यांचे सामाजिक कार्य खुप मोठे आहे. 

तसेच सर्व जोड्यांना मार्गदर्शन करत म्हणाले की आज विवाहबंधनात अडकणार आहात तर सर्वांनी सुखात संसार करा. व आपल्या आईवडिलांना,पत्निला मानसन्मान द्या. आपल्या आईवडिलांचे, पत्नीचे आदर करा. असे गौरव उदगार कांबळे यांनी केले.

   सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये वधु वरांचे हिंदू विवाह पद्धतीने विधीवत कन्यादान करुन विवाह सोहळ्यामध्ये मंगळसूत्र, जोडवी, शालु ,वराला ड्रेस उपरणी संसार सट देवुन थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला.

  या कार्यक्रमास डॉ विक्रम शिंगाडे, डॉ विक्रम सिंह जाधव,डॉ शर्वरी जाधव, अशोक नरोटे,डॉ प्रकाश कदम,डॉ युयुत्स आरती, बाळासाहेब पाटील , बोरगांव चे नगराध्यक्ष दिगंबर कांबळे,तात्यासाहेब केस्ते, संपत बोरगल,आस्मा कलावंत, अरुण यादव, तुषार कांबळे, सुधाकर माने, नेताजी गोरे, निलेश सनदी, अरुण कांबळे, सुशिल कांबळे, दिलिप कांबळे यांच्या सह नव वधू वर,मान्यवर,ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड प्रीती हटीमणी यांनी केले तर आभार पत्रकार अजित कांबळे यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने