Top News

काळ्या ओढ्याचा बांध फुटला ; दुषित सांडपाणी पुन्हा नदीत मिसळू लागले


इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

 इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदी पात्रात मिसळणाऱ्या दुषित पाणी थांबवण्यासाठी शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांनी शुक्रवारी ओढ्यात घातलेला बांध शनिवारी पाण्याच्या प्रवाहाने फुटला.

त्यामुळे दुषित सांडपाणी पुन्हा नदीत मिसळू लागले आहे. दरम्यान, याबाबतची माहिती समजल्यानंतर आंदोलकांपैकी काहीजणांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. आता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीपात्रत मिसळणाऱ्या प्रदुषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील नदीकाठावरील गावांमध्ये असंतोष पसरला आहे.

पाण्याच्या दाबाने मातीचा भराव ढासळला हे पाणी कायमस्वरुपी रोखण्यासाठी शुक्रवारी आंदोलन अंकुश संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी काळ्या ओढ्यात जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने मातीचा भराव व सिमेंटचे पाईप टाकत बांध घातला होता. बांध घातल्यानंतरही काळ्या ओढ्यातून पाण्याचा प्रवाह सुरुच राहिला होता. परिणामी शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ओढ्यातील पाण्याचा तुंब आमराई रोडवरील ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसरापर्यंत आला होता. मात्र साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या दाबाने मातीचा भराव ढासळला आणि बांध फुटुन पाणी पुन्हा प्रवाहित झाले.

थोडे नवीन जरा जुने