हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरढोण ग्रामपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, कर्मचारी तसेच शिरढोण गावचे पोलिस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. गावातील विविध तरुण मंडळांनीही जयंती उत्साहात साजरी करत कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
कार्यक्रमासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सवात सहभाग घेतला. संपूर्ण वातावरण भक्तीमय व प्रेरणादायी झाले होते.
