Top News

शिरोळ तालुका वृत्तपत्र विक्रेता संघाची निवड; नागेश गायकवाड अध्यक्षपदी बिनविरोध

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 शिरोळ तालुका वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच उत्साहात पार पडली. अध्यक्षपदी नागेश गायकवाड (कुरुंदवाड) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सुकुमार पाटील (जयसिंगपूर), सचिवपदी धनंजय सावंत (शिरोळ) तर खजिनदारपदी चिदानंद कांबळे (शिरोळ) यांची निवड झाली.

या निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रायाप्पा बाळीगिरी (धरमगुत्ती) होते. अध्यक्षपदासाठी नागेश गायकवाड यांचे नाव सुचविण्यात आले आणि त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या बैठकीस संजय कांबळे (कनवाड), मनोहर पाटील (कुटवाड), राकेश परीट (शिरटी), धवलकुमार खडके (शिरोळ), बापू कांबळे (आलास), दत्तात्रय कांबळे (तमदलगे), सुरेश गुरव, श्रेणिक सुतार (अकीवाट), बजरंग नंदीकुरळे (घोसरवाड), अरविंद बेनीचीटके (नांदणी), नाभिराज कबाडे (बुबनाळ), अशोक पाटील (टाकळी), गजानन वंट्टे (गणेशवाडी), गणेश सुनके (नृसिंहवाडी), सुहास शिरढोणे (हेरवाड), रमेश चव्हाण (चिपरी), सुभाष इंगळे (कोथळी) तसेच सौ. अनुराधा सावंत (शिरोळ) आदी उपस्थित होते.

यावेळी राज्य संघटनेचे सभासद होण्यासाठी सर्व वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांनी पुढाकार घेऊन नोंदणी करावी व संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार मनोहर पाटील यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने