अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
सद्या तापमानाचा पारा ४० अंशाच्यावर फिरत आहे.सकाळी दहा नतंर नुसतं गावातून फिरुन आलं तरी अंगातुन घामाच्या धारा वाहत आहेत.गृहिणीवर्ग दररोज सकाळ - संध्याकाळ स्वंयपाक करताना घामेघुम होत आहेत.
वृद्धाना तर घरातल्या घरात बसुन लाही लाही होत आहे. असा उन्हाळा कधी पाहीला नव्हता बाबा... असे शब्द सर्वाच्याच तोंडी ऐकायला मिळत आहेत. हा तीव्र उष्णतेचा मारा जसा मानवाला त्रासदायक ठरत आहे,तसाच तो निसर्गातील पशु,पक्षी,प्राणी,वनस्पतीवर गंभीर परिणाम करणारा जाणवत आहे. तीव्र उष्म्यामुळे मानावाला उष्माघात,निर्जलीकरण,चक्कर येणे,त्वचेचे आजार ,थकवा येणे अशा समस्या जाणवत आहेत.
अति उष्णतेमुळे चिमणी,कावळे,पोपट,मोर यासारख्या पक्ष्यांची संख्या कमी होत आहे.उष्णतेच्या ताणामुळे दुग्धजन्य प्राण्याच्या आरोग्यावरही परिणाम होवुन दुध उत्पादन घटले आहे.तीव्र तापामानामुळे पिकांवरही परिणाम दिसुन येत आहे.एंकदरीत सद्याचे तापमानामुळे संपुर्ण निसर्गचक्र विस्कळीत होताना दिसत आहे.
वाढत्या तापमानामुळे मानवी मनावर,पशुपक्षी,वनस्पतीवर अतिशय गंभीर परिणाम जाणवत असल्याचे पाहुन यापासुन संरक्षण,काळजी घेण्याविषयीचा संदेश सोशियल मिडीयावरुन सर्वत्र फिरत आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभाग, महाराष्ट शासनाच्या नावाखाली फिरणार्या संदेशामध्ये सद्या राज्यात उष्णतेची लाट आली असुन येलो अलर्ट जारी केल्याचा इशारा आहे.तर नागरिक संरक्षण महासंचनालयाच्या नावाखाली फिरणार्या संदेशामध्ये "तीव्र तापमानाचा हाय अलर्ट जारी "चा संदेश पहायला मिळत आहे. या संदेशानुसार १२ मे पर्यंत तापमान ४५ ते ५५ अंश सेल्यिअस पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला आहे.तसेच काही इशारेवजा मौलिक सल्लेही देण्यात आले आहेत.जसे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने घराच्या बाहेर जाऊ नये,घरातील हवा खेळती राहण्यासाठी दारे- खिडक्या उघड्या ठेवा,मोबाईलचा वापर कमी करा,दिवसभर भरपुर पाणी प्या,दही,ताक,लिंबु पाणी,बेलफळाचा रस अशा थंड पेयाचे सेवन करा.हलकी,पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरा.लहान मुले,वयोवृद्ध ,आजारी व्यक्तीची काळजी घ्या असा काळजीवाहु संदेश सर्वाना पाठविला जात आहे. वैशिष्ठ म्हणजे आताच्या परिस्थितीत हे सर्वानाच लागु पडत असल्यामुळे जो तो हा संदेश आपले मित्र-मैत्रिण,पै पाहुणे,नातेवाईक,आप्तस्वकीय,भाऊबंद,शेजारी यांना पाठविला जात आहे. एकुणच काय तर सोशियल मिडीयाच्या संदेशातुन आपणास उन्हाळ्यामुळे त्रास सोसावा लागु नये,काळजी घ्यावी हाच हेतु यातुन दिसुन येतो.
