Top News

शिरोळमध्ये बंद घर फोडून ३० हजारांचे दागिने लंपास; घराबाहेर ठेवलेली चावी वापरून डल्ला

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ येथील दत्तनगर मांजरे मळा परिसरात एका बंद घराचे कुलूप चावीने उघडून चोरट्यांनी कपाटातील सुमारे ३० हजार २०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी ११ ते दुपारी २.३० च्या सुमारास घडली. याप्रप्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राणी माणिक मांजरे (वय ३८) या आपल्या नातेवाईकांकडे बारशाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. घराला कुलूप लावून त्यांनी घराबाहेर असलेल्या शेडमधील एका शर्टच्या खिशात घराची चावी ठेवली होती. फिर्यादी कुठे चावी ठेवतात, याची माहिती असलेल्या अज्ञात चोरट्याने ती चावी शोधून काढली. त्यानंतर घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला आणि कपाटातील डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. यामध्ये सोन्याच्या कानातील रिंगा (अंदाजे २.५ ग्रॅम) - २०,००० रुपये बदाम आकाराचे सोन्याचे पदक (अंदाजे १ ग्रॅम) - ९,००० रुपये

चांदीचे ब्रेसलेट (अंदाजे १० ग्रॅम) - १,२०० रुपये असा एकूण ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या घटनेची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास शिरोळ पोलीस करीत आहेत

थोडे नवीन जरा जुने