Top News

कवठेगुलंदचे ग्रामदैवत श्री मरिआई देवी व श्री लक्ष्मीदेवीची मंगळवारपासुन यात्रा

 अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

 कवठेगुलंद (ता.शिरोळ) येथील ग्रामदैवत श्री मरिआईदेवी व श्री लक्ष्मीदेवीची यात्रा मंगळवार दि.२१ ते २३ एप्रिल अखेर आयोजीत करण्यात आली आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम ,मनोरंजन, विविध स्पर्धा तसेच कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजन करण्यात आले आहे.

पंरपरेनुसार अक्षय तृतिया झाल्यानतंर येणार्‍या मंगळवारी ही यात्रा आयोजीत करण्यात येत असते. यात्रेनिमित्त मंगळवार दि.२१ रोजी पहाटे तीन वाजता पालखी नदी स्नानासाठी जाईल.पालखी सहस्त्र नामावली तसेच दंडवत व पाणी घालणे सुरु होईल.पहाटे पाच वाजता गावचे शिंदे सरकार यांच्या हस्ते अभिषेक व मरिआई देवीची मानाची ओटी भरणे. यानतंर दिवसभर ग्राम महानैवेद्य व ओटी भरणे.

सांयकाळी सात वाजता पालखी व आंबिल प्रदक्षिणा,देवीचा महानैवेद्य,भाकणुकीचा कार्यक्रम व शोभेच्या दारुची आतषबाजी होईल.रात्री आठ वाजता देवीचा महाप्रसाद होईल.रात्री साडेनऊ वाजता कोल्हापुर येथील "आँर्केस्टा म्युॅझिकल धडाका"चा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल.

  बुधवार दि.२२ रोजी सकाळी ९ वाजता सायकल जनरल स्पर्धा, साडेनऊ वाजता हातात बैल धरुन पळणे, दहा वाजता टु व्हिलर मागे रेडकु पळवणे, दुपारी तीन वाजता भव्य कुस्तीचे जंगी मैदान होणार आहे. तर सांयकाळी पाच वाजता लहान गट धावणे स्पर्धा,साडेपाच वाजता मोठा गट धावणे स्पर्धा,सहा वाजता जनरल धावणे स्पर्धा होणार आहेत.

 सर्व स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.यासाठी प्रवेश फी असुन सहभागी होणार्‍या स्पर्धकानी यात्रा कमिटीशी संपर्क साधावा असे आवाहन श्री मरिआई मंदिर समिती व यात्रा कमिटी कडुन करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने