Top News

अकिवाट मध्ये तंटामुक्त अध्यक्ष पदी कुमार तवंदकर यांची निवड

अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क : 

     अकिवाट (ता.शिरोळ) येथे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गावसभ खेळीमेळीत पारपडली.यावेळी गाव सभेत तंटामुक्त अध्यक्ष पदी बिनविरोध कुमार तवंदकर याची निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती वंदना सुहास पाटील होत्या.

यावेळी ग्राम विकास अधिकारी विजय कोळी यांनी शासकीय परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. तंटामुक्त अध्यक्ष पदाचा चार महीन्याचा कालावधी संपल्या नंतर गणपती कागे यांनी पदाचा राजीनामा दिला. यावेळी बिनविरोध तंटामुक्त अध्यक्षपदी कुमार तवंदकर यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्ते या़ंनी फटाके उडवून आनंदउत्सव साजरा केला.

यावेळी सरपंच वंदना सुहास पाटील, उपसरपंच श्रीराम हुजरे, ग्रामपंचायत अधिकारी विजय कोळी, अमोल माने, मा.तंटामुक्त अध्यक्ष गणपती कागे,जाफर तहसीलदार, सलमान बैरागदार, पोलीस पाटील सचिन कांबळे, आण्णासो पाणदारे, वैद्य आशोक गायकवाड,तहसीलदार गुरुजी, आप्पासो बडबडे, आप्पासो दानोळे, रावसाहेब नाईक, सुरज माने, निलेश तवंदकर,आण्णासो हेरवाडे, सुरज माने, पुंडलिक गायकवाड, अमोल तवंदकर याच्यासह ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने