Top News

इचलकरंजी महानगरपालिकेची 30 कोटी थकबाकी वसुलीसाठी कुरुंदवाडमधील पाणीउपसा कार्यालय सील



अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

इचलकरंची महानगरपालिकाची बिगर सिंचन थकबाकी ३० कोटीच्या वसुलीसाठी जलसंपदा विभागाकडुन कुरुंदवाड येथुन होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला.

  मंगळवार दि. २४ रोजी ही कार्यवाही करण्यात आली. याबाबत अधिक माहीती अशी की,कुरुंदवाड येथील कृष्णा पाणीपुरवठा योजनेतुन इचलकरंजी महानगरपालिकेला पाणीपुरवठा केला जातो. याची ३० कोटी थकबाकी आहे. यामध्ये पाणी वापर शुल्क ९ कोटी ३२ लाख,स्थानिक उपकर ३ कोटी १५ लाख,दंड १४ कोटी ३७ लाख,विलंब शुल्क ३ कोटी ४४ लाख असा एकुण ३० कोटी २९ लाख रुपये इचलकरंजी महानगरपालिका जलसपंदाचे देणे आहे. सद्या मार्च अखेर सुरु असल्याने जलसपंदा विभागाकडुन बिगर सिंचन थकबाकी वसुली मोहीम सुरु आहे.या अतर्गत जलसंपदा विभागाने थकबाकी वसुलीसाठी कुरुंदवाड येथील पाणीपुरवठा उपसा करणार्‍या कार्यालयाला सील करण्यात आले.

  जलसंपदाचे अधिकारी दा.आ.पुजारी रावसाहेब,सतीश उपाध्ये,दप्तर कारकुन शशिकांत कोडग रावसाहेब,श्रीमती बडे मडॅम,श्रीमती सपकाळ मडॅम,महानगरपालिकेचे कर्मचारी प्रशांत भोसले यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

थोडे नवीन जरा जुने