इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून उभ्या असलेल्या आमच्या भाची सौ. मृणालीराजे सुशांत पाटील व दत्तवाड पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार बाबुराव पोवार यांना उच्चांक मताधिकांनी निवडून द्या ते नक्कीच दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघाचा विकास करतील असे प्रतिपादन माजी आमदार, धुळे - नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीमंत राजवर्धन कदमबांडे यांनी व्यक्त केले. दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघाचे भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मृणालिनीराजे पाटील व दत्तवाड पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार बाबुराव पोवार यांच्या प्रचारार्थ दत्तवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मृणालिनीराजे या नागपूर घराण्याच्या कन्या आहेत ते या मतदारसंघाचा नक्कीच विकास करतील जाती-पाती मध्ये न अडकता आपल्या मतदारसंघाचा कायापालट कसा करता येईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न राहील त्या उच्चशिक्षित असल्यामुळे याचा फायदा मतदारसंघातील जनतेला होणार आहे. येणाऱ्या ७ तारखेला कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या.
श्रीमंत राजे मुधोजी भोसले महाराज आँफ नागपूर म्हणाले , सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक सर्वत्र सुरू असून लहानपणापासूनच मृणालिनीराजे यांना जणतेची सेवा करण्याची आवड आहे. त्या नक्कीच राजघराण्यातील परंपरा चालवतील. दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघाचा विकास त्या नक्की करतील याची ग्वाही मी देतो. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सत्ता असून वित्त खाते सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे आहे. त्यामुळे या मतदारसंघातील विकास कामाला निधीची कमतरता भासणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद व्यतिरिक्त इतर फंड आणून विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दत्तवाड जिल्हा परिषद च्या उमेदवार मृणालिनीराजे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, मी गेल्या दोन महिन्यांपासून दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघामध्ये फिरत असून मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद माझ्यामागे आहे. दत्तवाड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या मतदारसंघाचा कायापालट करेण, महिलांसाठी ज्या ज्या योजना आहेत. त्याचा लाभ सर्व महिलांना मिळण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. अनेक योजना महिलांच्यासाठी आहेत. त्या योजना मतदारसंघातील महिलांच्या पर्यंत नक्कीच पोहोचवणे हे माझे कर्तव्य आहे. सत्तेसाठी नाही सेवेसाठी मी उभी आहे. कमळ या चिन्हाला साथ द्या व येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत माझ्या कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून व पंचायत समितीचे उमेदवार बाबुराव पोवार यांच्या सुद्धा कमळ या बटना समोर बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या.
यावेळी पंचायत समिती उमेदवार बाबुराव पोवार, संजय दादा पाटील (संचालक केंद्रीय रसायन मंत्रालय), भाजपा जिल्हा नेत्या वर्षा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजपा युवा नेते सुशांत दादा पाटील, यशवर्धन कदमबांडे, अंकुश पाटील, राजगोंडा पाटील- गुमटे, तेजस वराळे, चंद्रकांत बिरंणगे, बबन मोठे, मयुर खोत, बाळू मोठे, सुनिल कुंभार त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
