Top News

आण्णा महाराज पुण्यतिथीनिमित्त अ.लाट येथे उद्यापासुन श्री गुरुचरित्र पारायण व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :


अ.लाट (ता.शिरोळ) येथील संत शिरोमणी श्री.प.पु.सदगुरु आण्णा महाराज यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त मंगळवार दि.२० ते २६ जानेवारीअखेर श्री गुरुचरित्र पारायण व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  यामध्ये मंगळवार दि.२० रोजी रात्रो ८ वाजता अमरावतीचे चेतन श्रीकृष्ण आमटे यांचे शास्त्रीय गायन,भक्तीसंगीताचा कार्यक्रम,दि.२१ रोजी सांयकाळी ७ वाजता इचलकरंजी येथील अमृतधारा प्रस्तुत भजनाचा कार्यक्रम,दि.२२ रोजी सांयकाळी ७ वाजता हुबळीचे पं.कृष्णेंद्र पुजारी (वाडीकर) यांचे शास्त्रीय गायन व भक्तीसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.

  शुक्रवार दि.२३ ते २५ अखेर सांयकाळी ७ वाजता ह.भ.प.गजानन विश्वनाथ काणे गणेशवाडीकर यांचे कीर्तन होणार आहे. सोमवार दि.२६ रोजी प.पू.सदगुरु आण्णा महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त पहाटे ५ वाजता श्रीं च्या समाधीवर रुद्राभिषेक, सकाळी ८ वाजता श्रीं च्या समाधीवर पुष्पवृष्टी,९ वाजता लिंगणुर मठाचे श्रीधाम महाराजजी यांचे आशिर्वचन,११ वाजता अ.लाट पंचक्रोशीतील भक्त मंडळीचे भजन ,यानतंर महाप्रसाद होईल. दरम्यान दैनदिन कार्यक्रमामध्ये सकाळी ६ ते ९ व्यासपीठ चालक योगेश कुलकुर्णी यांच्या उपस्थितीत श्री गुरुचरित्र पारायण,सांयकाळी ५ वाजता हरिपाठ,सांयकाळी ६ वाजता नामजप होईल.सर्व कार्यक्रम श्री दत्त मंदिर,(आण्णा महाराज)नदीवेस येथे होतील.

सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा .तसेच ज्या भाविकांना महाप्रसादासाठी अन्नधान्य रुपात पदार्थ,देणगी द्यावयाची आहे त्यांनी श्री दत्त  मंदिर,नदीवेस येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने