कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरूंदवाड: मजरेवाडी कुरुंदवाड रस्त्यावर नजीक असणाऱ्या आशीर्वाद बिअर बार &परमिट येथे येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कुरुंदवाड ग्रामीण बार असोसिएशनची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये कुरुंदवाड ग्रामीण बार व परमिट रूम असोसिएशनच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक युवा नेते अनुप मधाळे यांची तर सचिव म्हणून उदय पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली यामध्ये सहा उपाध्यक्ष, एक खजिनदार यांचा समावेश आहे.
परमिट रूम बियर बार चालवताना येणाऱ्या अडचणी, शासनासह संबंधित खात्याने लाभलेल्या जाचक अटी, तर इतरांच्या कडून वारंवार होणारा नाहक त्रास यावर सांगोपांग चर्चा करण्यात येऊन आगामी काळात येणाऱ्या समस्यांना एकत्रितपणे सोडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्याचा आला यावेळी कुरुंदवाड ग्रामीण परमिट रूम व बियर बार असोसिएशनची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
अध्यक्ष अनुप रामदास मधाळे, उपाध्यक्ष बापूसो कोळी टाकळीवाडी, बबन खोत लाटवाडी, दीपक गावडे कवठेगुलंद, अरुण खडके शिरोळ, राकेश जमदाडे कुरुंदवाड, अभिषेक बंडगर कुरुंदवाड, खजिनदार सागर चव्हाण तर सदस्यपदी रमेश कुंभार, अक्षय जाधव, सचिन जगताप कवठेगुलंद, शाहिद मुजावर, मिलिंद लाड शेडशाळ, निलेश बन्ने, जयवंत मंगसुळे, सचिन भोसले, ऋषिकेश शिंदे गौरवाड, सागर आंबूपे, योगेश पाटील, अभिषेक बंडगर, सागर आंबोपे कुरुंदवाड, सुसम गायकवाड, रोहिदास अभिनंदन घोडके, कृष्णा चव्हाण तेरवाड, अभिजीत मस्के, सुमंत शिरढोणे, किरण आलासे, अमोल घोडके, मनोज शिंदे हेरवाड, दौलत माने, अनिल पाटील, शुभम खतार, सुनील पाटील दत्तवाड, सचिन गावडे, उत्तम कांबळे आलास, शंकर कोळी, विठ्ठल गोरे, रणजीत पाटील, बापू कोळी, सुरज पाटील टाकळी, अजिंक्य नरुटे, अमोल कागले मजरेवाडी, शिवराज तासगावे दानवाड यांचा समावेश आहे.
