Top News

इचलकरंजी येथे केंगन वॉटर सेंटरचे उद्घाटन


  इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

                पाच मैल येथील सुमंगल पेट्रोल पंपाचे मालक राजाराम लोकरे यांनी त्याच्या मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त केंगन वॉटर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

सदर सेंटरचे उद्घाटन वडगाव मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी लोकरे यांचे आतेभाऊ जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. इचलकरंजीचे कामगार नेते माजी उपनगराध्यक्ष मिश्रीलाल जाजू ,बांधकाम कमिटीचे माजी सभापती भाऊसो आवळे, नगरसेवक किसन शिंदे, नगरसेवक दादासो भाटले, कृषी अधिकारी संजय वाघमारे, अखील महारष्ट्र चर्मकार समाज सेवा संघ राज्य सरचिटणीस जी. आर. लोकरे. जिजाउ महिला पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कोळी , लोकरे यांचे नातेवाईक, मित्र मंडळी व बहुसंख्य शिक्षक वर्ग उपस्थित होते. 

यावेळी लोकरे म्हणाले की, सदर केंगण वॉटर मशीनचे पाणी शरीरासाठी खुप उपयुक्त आहे. हे पाणी म्हणजे मानवी जीवनाला मिळालेले अमृतरुपी वरदान आहे. जर हे पाणी माझ्या आईला एक वर्षा पूर्वी मिळाले असते तर आज माझी आई जीवंत असती. जे दुःख माझ्या वाट्याला आले ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी सदर मशीनचे उद्घाटन आपल्या आईच्या प्रथम पुण्यतिथी दिवशीच करण्याचे योजले होते. ते पुढे म्हणाले की,दिवसभरात तीन ते चार लिटर केंगेण वॉटर प्याल्याने मनुष्य निरोगी होतो. त्याचे आयुष्य वाढते.

या मशीनची अधिक खोल वर माहिती देण्यासाठी यात तज्ञ असणारे अजित सिंग, तानाजी तांबे यांना डेमो व मार्गदर्शनसाठी निमंत्रित केलं होते. 

            अजित सिंग यांनी केंगान विषयी बोलताना म्हणाले की, केंगेन वॉटर हे जॅपनीज देशाचे आयनॉझर वॉटर मशीन आहे. हे मशीन औसिड युक्त पाण्याचे अल्कलिन पाण्यात रूपांतर करते. की जे आपल्या शरीराला खुप उपयुक्त आहे.

            आपल्या शरीरातील रक्ताचा ph हा 7.35 असतो. आणि आपण रेग्युलर जे पाणी पितो. ते ॲसिड युक्त असल्याने त्यामधून आपणास हवा तितका ph मिळत नाही. त्यामुळे आपल्या शरीरातील सेल डेड होऊन आपणास अनेक प्रकारचे रोग होतात. ७ च्या आतील ph असणारे पाणी हे ॲसिड युक्त असत. 7 ph पाणी हे न्युट्रल असत तर 7 ph चया पुढील ph चे पाणी हे अल्कलिन असते.रक्तातील ph जर ६ च्या आत आला तर कॅन्सर होण्यास सुरवात होते.

केंगेनं पासुन मिळणाऱ्या पाणी हे अल्कलिन पाणी आहे. त्याचा ph हा 8,9, 9 ते 9.5 असा वाढवता येतो. या मुळे शरीर निरोगी राहत. आयुष्य वाढतं. रोग होण्याचा संभव नसतो .तसेच हे पाणी नेहमित पिल्याने बीपी, शुगर नॉर्मल होतो. या पाण्यामुळे शरीरातील मृत सेल, डीटॉकस बाहेर टाकले जातात तसेच नवीन स्त्राँग सेल तयार होतात. त्यामुळे मनुष्य निरोगी होतो शरीरातील उत्साह वाढतो. रोगाचे निवारण होते. दिर्घायुष्य लाभते.

नॉर्मल माणसांनी सुरवातीला या मशीन मधून निघणाऱ्या पाण्यातील 8 pH चे पाणी प्यावे हळू हळू ते वाढवून 9 ते 9.5 पर्यंत घ्यावे. किमान दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्यावे.

बीपी, शुगर असणाऱ्यांनी 11.5 चे पाणी सकाळी अनुष्यापोटी एक वाटी व सायकाळी अनुष्या पोटी एक वाटी घ्यावे. बीपी शुगर चा त्रास नाहिसा होतो. 6.5 pH च्या पाण्याचा वापर चेहरावर ब्युटी साठी ब्युटी पार्लर प्रमाणे करता येतो. यामुळे चेहरा तजेलदार मुलहीम व कोमल होतो 

2.5 ph पाण्याचं वापर शेतीतील कीटकनाशका साठी करता येतो. त्याच बरोबर शरीरावर असनारे पांढरे कोड घालवण्यासाठीही याचा चांगल उपयोग होतो.

          अश्या प्रकारे बहुउपयोगी असणारे हे मशीन म्हणजे मानवाला मिळालेले अमृत रुपी वरदान आहे. अशा या केंगन मशीन चे सेंटरचें उद्घाटन लोकरे सरांनी शहापूर इचलकरंजी येथे केले आहे याचा जास्ती जास्त लोकांनी फायदा घ्यावा. असे आवाहन केले.

थोडे नवीन जरा जुने