Top News

कन्या विद्या मंदिर शिरढोणच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतील यश कौतुकास्पद: डॉ कुमार पाटील


 हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरढोण येथील जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश हे कौतुकास्पद असून शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन; पालकांची साथ आणि विद्यार्थ्यांचे प्रयत्न, जिद्द, इच्छाशक्तीच्या बळावर मिळवलेले हे यश विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक कार्यासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था शिरढोणचे सचिव व श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार पाटील यांनी काढले. ते शिरढोण येथील कन्या विद्या मंदिर शिरढोणच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री बाबासो मालगावे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री राजू मुजावर, पालक प्रतिनिधी श्री अमोल चौधरी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री विठु बंडगर सर यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ कुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांची यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी वेद, समृद्धी, टी एस इ, शासकीय स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री व्ही एन बंडगर सर -मुख्याध्यापक , श्री एस बी इंगळे सर ,श्री एस बी चुडाप्पा सर, श्री पी आर नाईक सर , एस व्ही भावसार मॅडम , श्री आर पी दळवी सर, एल बी कांबळे मॅडम, शुभांगी यादव मॅडम, यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने