सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :
मनोहर मांगले यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हसन मुश्रीफ फाउंडेशन, कागलच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विद्यार्थिनींना क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शन करत त्यांनी मिळवलेल्या यश आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आज सकाळी नूल येथील इंदिरा देवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल टेकनिकल व ज्युनिअर कॉलेजतर्फे मनोहर मांगले यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक हा पुरस्काराच्या निमित्ताने हा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
