पूर ओसरल्यानंतर दिसतोय केमिकलचा थर ; प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणी करण्याची गरज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यामध्ये पाणी ओसरत चालले असतानाच रस्ते व शेतामध्ये पांढऱ्या रंगाच्या केमिकलचा थर आढळून येत असल्याने पुरामध्ये पंचगंगा प्रदूषित करणारे घटक पुराच्या पाण्यात प्रदूषित पाणी सोडत असल्याची चर्चा असून शेतीमधील पिकांना या प्रदूषित पांढऱ्या रंगाच्या केमिकलच्या थराचा धोका निर्माण होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
अगोदरच महापुराचे पाणी व पावसाच्या पाण्याने शेतीचे अपरिमित अशी हानी झाली आहे त्यातच केमिकल चा पांढरा थर रस्ता व शेतीत नि दिसत असल्याने आदीच "उल्हास त्यात फाल्गुन मास" अशी अवस्था शेतकऱ्यांची होताना दिसत आहे.
अनेक दिवसाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पुराचे पाणी हळूहळू ओसरत चालले असल्याने पांढऱ्या रंगाच्या केमिकलचा थर बहुतांशी ठिकाणी दिसून येत आहे. फक्त रस्त्यावरतीच हा तर न दिसता आजूबाजूच्या शेतातील गाळावर रस्त्याचे बाजूस असणारे दगड गोटे यावरही हा थर ठळकपणे दिसून येत आहे हा पांढरा रंगाचा केमिकलचा थर असल्याचा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे महापुराच्या पाण्याची संधी पाहून नदीच्या पाण्यामध्ये पंचगंगा प्रदूषित करणारे घटक केमिकलचे पाणी नदीमध्ये सोडल्याने हा थर निर्माण झाला असावा, अशी शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. प्रदूषण मंडळाने याकडे लक्ष देऊन तातडीने त्याची तपासणी करावी व पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांच्यावर कडक कारवाई करावी तसेच शेतीचे नुकसान थांबवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, कुरुंदवाड येथील प्रगतशील शेतकरी कायदेतज्ञ ॲड. जयकुमार पोमाजे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत जाब विचारणार असल्याचे सांगितले आहे.
