हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
आलास माळ भागातील जिवा भावाची माणुसकी जपणारी स्टार सहारा बहुउद्देशीय सेवा भावी संस्था. येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.सर्वासोबत एक पाऊल पुढे टाकत ही संस्था आपले कार्य करीत आसते.कोरोना व महापुर सारख्या काळात देखील अनेकांना मदत केली.रक्ताची गरज जगभरात वाढत आहे आणि गरजु लोकांचे जीवन वाढविण्यासाठी आपल्याला जीवनात एकदा रक्तदान करणे आवश्यक आहे.विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, रक्त देणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि आपण दान केलेल्या रक्ताचे प्रमाण आपल्या शरीरात कमी कालावधीत पुन्हा निर्माण होते.. म्हणुन रक्तदान करा व सहकार्य करा.असे आवाहन स्टार सहारा बहुउद्देशीय सेवा भावी संस्थे मार्फत करण्यात आले. रक्तदान शिबिराचे आयोजन लाल बहादूर हायस्कूलच्या समोर आलास (माळभाग) येथे करण्यात आले आहे.
