अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कर्नाटकची दुसरी राजधानी समजल्या जाणाऱ्या बेळगाव शहरातील हिंडलगा कारागृह (जेल ) हे अनेक वादाच्या भोवऱ्यात असल्याचे आढळून आले होते. या पार्शवभूमीवर काल पहाटेच्या सुमारास नूतन आयुक्त याडा मार्टीन मारबानयांग यांच्या नेतत्वाखालील पोलीस फौजफाट्यासह कारागृहावर छापा टाकला.
बेळगाव येथील हिंडगला कारागृह शेजारील कळंबा या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर येथे गेल्या काही महिन्यात एकंदर 36 मोबाईल व साहित्य पोलिसांनी जप्त केले असल्याचे वर्तमान पत्रातून निदर्शनास आले आहे.अगदी या पारश्वभूमीवर काल पहाटेचा सुमारास कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांच्यासह 260 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारीचा मदतीने हिंडलगा कारागृहावर छापा टाकला *. छापा दरम्यान पोलिसांनी तंबाखूचे पाकीट ,सिगरेट, तीन चाकू, एक छोटे हीटरचे बंडल, एक इलेक्ट्रिकल स्टो ,आणि इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
