शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
संपूर्ण महाराष्ट्रासह, कोल्हापूर जिल्हा तसेच विशेषकरून शिरोळ तालुका 2024 मधील पुर परिस्थितीने त्रस्त झाला आहे. चौदा ते पंधरा दिवस पुराचे पाणी जैसे थे आहे. कालपासून पाणी ओसरत आहे. यामुळे तालुक्यातील अनेक कुटूंबे आपलं घरदार सोडून राहिले आहेत.या पुराचा फटका पुर क्षेत्रातील अनेक गावांना बसला आहे. काही दुर्घटनाही घडल्या आहेत. यामुळे शासनाने पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने शिरोळचे नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना देण्यात आले
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि शिरोळ तालुका काँग्रेसचे नेते उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी शिरोळ तहसील कार्यालयात येऊन पूरग्रस्तांच्या मागणी संदर्भातील निवेदन दिले आहे. पूरबाधीत शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करणे व एकरी एक लाख नुकसान भरपाई दयावी. पूरबाधीत व स्थलांतरीत लोकांना तातडीने सानुग्राह अनुदान देण्यात यावे. ज्या गावांना चारी बाजुने पूराचा वेढा पडतो अशा सर्व गावांना संपूर्ण गाव पूरबाधीत घोषीत करावे. सर्व शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कामगार यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून तातडीने घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दयावा महापूरामध्ये खराब झालेल्या रस्त्याची पहाणी करून तात्काळ खराब रस्त्याची दुरूस्ती करावी.आपत्तीच्या वेळी काम करण्यारे रेस्क्यू फोर्सच्या जवानांना मानधन सुरू करावे. प्रत्येक गावामध्ये निर्जतुकिकरण फवारणी व रोगराई पसरू नये याबाबतच्या सुचना ज्या त्या विभागाला देण्यात यावेत सदर मागण्यांची तात्काळ अमलबजावणी करावी. अन्यथा शिरोळ तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे
यावेळी बोलताना काँग्रेस नेते शेखर पाटील म्हणाले की 2024 च्या महापुराने शिरोळ तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे हा तालुका ओला दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करून पूरग्रस्तांना तातडीची मदत द्यावी नुकसानग्रस्त शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत अकिवाट येथे झालेल्या दुर्घटनेला शासनच जबाबदार आहे जर महापुरात शासनाने पिण्याच्या पाण्याची सोय केली असती तर पाणीपुरवठा सुरू करायला जाऊन समाजसेवकांचा जीव गेला नसता त्यामुळे महापुराच्या वेळी शासनाकडून पिण्याचे पाण्याची सोय होणे गरजेचे आहे तसेच पुन्हा महापूर येऊ नये याची खबरदारी सुद्धा शासनाने घेण्याची गरज आहे
निवासी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांनी आपल्या निवेदनातील मागण्या शासन दरबारी पाठवून पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले
यावेळी काँग्रेसचे नेते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील दरगू गावडे माजी नगरसेवक विठ्ठल पाटील नितीन बागे जयदीप थोरात धनाजी पाटील नरदेकर बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर बाबासो पुदें सुरेश माणगावे युनूस जमादार संदीप हवालदार गुरुप्रसाद धनवडे हेमंत आवटी श्रवण लंबे फैसल पटेल वाशिम जमादार मुजमील पठाण अमरसिंह कांबळे सरफराज जमादार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
